आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीचा लाभ:केंद्राच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज; पालकांचे ४.५ लाख वार्षिक उत्पन्न असणारे पात्र

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत अर्थात इयत्ता बारावी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले असतील. तसेच पदवी अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी केंद्र सरकारच्या सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहे. राज्यातील पहिल्या सात हजार ४१७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उच्च शिक्षण संचालकांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यात महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना http://scholoarships.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या अर्जाची मुदत असून, अर्जाच्या प्रती या आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन शिष्यवृतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे, प्रशासनाने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

अशा आहेत पात्रता व अटी
अर्जदार विद्यार्थी कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.पालकांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा अधिक नसावे.अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षांपर्यंत तर इतर अभ्यासक्रमांना पाच वर्षांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...