आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तीपत्र:महावितरणचे परिमंडळातील 103  विद्युत सहायकांना नियुक्तीपत्र

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्युत सहायक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने १ हजार १३ विद्युत सहायकांना विविध ठिकाणी नियुक्तीपत्रे दिली आहेत. यात जळगाव परिमंडळातील १०३ विद्युत सहायकांचा समावेश आहे. नियुक्तीपत्र मिळल्याने विद्युत सहाय्कांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्युत सहायकांना नियुक्तीपत्रे देऊन या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. महावितरणच्या विभागीयस्तरावर या सहाय्यकांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल असेही महावितरणने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...