आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षांपासून रस्त्यांची वानवा:पार्वतीनगरात 400 ते 450 रस्ते-गटारींच्या साफसफाईसाठी केवळ 43 लोकांचीच नेमणूक

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्वतीनगरात गेल्या 40 वर्षांपासून रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यातच या परिसरात 50 कॉलन्यांतील 400 ते 450 रस्ते-गटारींच्या साफसफाईसाठी केवळ 43 लोकांचीच नेमणूक असल्याने या परिसरात गटारींची अधिक बिकट समस्या आहे. त्यातच या परिसरात 40 वर्षांपासून रस्ते नाहीत. अशी स्थिती या परिसरातील गटारींची झाली असल्याने आतातरी या परिसरातील रस्ते गटारी करण्याची गरज असल्याची भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पार्वतीनगरच नाही तर या परिसरातील साने गुरुजी कॉलनी, स्नेहल कॉलनी, पारखनगर, टेलिफोननगर, वल्लभनगर आदी परिसरात रस्ते, गटारींची वानवा आहे. हा परिसर उच-सखल भागात वसला आहे. येथील अनेक भागात कच्चे उखळलेले रस्ते तर आहेतच याच बरोबर तुटलेल्या गटारींमुळे देखील येथील नागरिक त्रस्त झाले आहे. काही लोकांनी या परिसरातील गटारींवर गाड्या लावण्यासाठी बंदिस्त केल्या असल्याने जेथे गटारी उघड्या आहेत, अशा भागात हे नागरिक आपल्या घरपरिसरातील कचरा टाकून देत असल्याने वादही होत आहे. तर काही ठिकाणी गटारींचा गाळच काढल्या जात नसल्याने या गटारी बंद झाल्या आहेत.

40 वर्षांपासून रस्ते नाहीत

पार्वतीनगरात गेल्या 40 वर्षांपासून रस्त्यांची वानवा आहे. 40 वर्षांपूर्वी पार्वतीनगर परिसरात अटलांटा कंपनीमार्फेत या परिसरात रस्ते तयार करण्यात आले होते. आज या परिसरातील एकही रस्ता धड लाहिलेला नाही. सर्वच रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात या परिसरात अधिक दयनीय स्थिती होते. तरी या परिसरात रस्ते तयार करण्याची गरज आहे, असे पार्वतीनगर रहिवासी रमेश पवार यांनी म्हटले.

गटारी तयार करण्याची गरज

या परिसरात ठिकठिकाणच्या गटारी तुटल्या आहे. तर अनेकांनी येथील गटारी काढल्या जात नाहीत, म्हणून बुजवून ठेवल्या आहेत. नागरिक घर-परिसरातील कचरा या उघड्या गटारीत टाकत असल्याने वादविवादाचे प्रसंगही होत आहेत. यामुळे परिसरात सर्वत्रच बंदिस्त गटारी बनण्याची गरज आहे, असे बापू कुमावत म्हणाले.

डास निवारण्यासाठी फवारणीची गरज

या परिसरात गटारींचा निचरा होत नसल्याने मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यातच या गटारीही काढल्या जात नसल्याने येथे मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत या आहे. परिसरात महापालिकेकडून नियमित फवारणीची गरज आहे. तसेच येथे या परिसरात पसरलेल्या मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची देखील गरज आहे. गेल्या कित्येक वर्षात हे वृक्ष न छाटल्याने कोरड्या फांद्या पडून अपघात होऊ शकतो, अशी चिंता एकनाथ बडगुजर यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...