आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षण:उच्च शिक्षण संस्थांत आता विद्यार्थी सेवा केंद्र, समुपदेशकाचीही नियुक्ती ; शारीरिक, मानसिक आरोग्याबाबत तरतूद

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी रहावे या हेतूने त्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांच्या नियुक्तीसह उच्च शिक्षण संस्थांत विद्यार्थी सेवा केंद्र स्थापन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत आता देशपातळीवर गांभीर्याने विचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी सेवा केंद्रांची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि नैराश्य दूर करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती रोखणे तसेच त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी विद्यार्थी सेवा केंद्र ही सुविधा एक खिडकी पद्धतीने काम करणार आहे. उच्च शिक्षण संस्थेतेचे कॅम्पस, वसतिगृह, मैदाने, कॅन्टीन, ग्रंथालय अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन आयोगाने मार्गदर्शक सूचना कार्यान्वित केल्या आहे. शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आयोगाने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती.

असे राहील विद्यार्थी सेवा केंद्र { प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये केंद्राची स्थापन { विद्यार्थ्यांमधील ताणतणाव, भावनिक प्रश्नांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र जबाबदार असेल { ग्रामीण, वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याची व्यवस्था { केंद्राचे काम संचालक किंवा अधिष्ठाता पदाशी समकक्ष असलेल्या मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, सामाजिक शास्त्र अशा विषयातील प्राध्यापक करतील { एखाद्या उच्च शिक्षण संस्थेत संबंधित विषय उपलब्ध नसल्यास अन्य संस्था किंवा विद्यापीठांचे सहकार्य घेता येईल

बातम्या आणखी आहेत...