आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघे सात महिने शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या प्रभागात कामांची घाई आहे. त्यामुळेच १०० काेटींतील उर्वरित ६२ काेटींच्या निधीचे नियाेजन सुरू झाले आहे. भाजपने शिल्लक निधीतून १०२ रस्त्यांची कामे सुचवली असून, ताे प्रस्ताव महासभेत मंजूर केला जाणार आहे. त्यासाठी लागणारा निधी मंजुरीची जबाबदारीही विराेधकांवर साेपवली जाण्याची शक्यता आहे.
रस्त्यांची कामेही आता नागरिकांसाेबतच नगरसेवकांसाठी प्राथमिकता आहे. यामागे मतदारांचा वाढलेला राेष कारणीभूत ठरत आहे. साडेचार वर्षांत काय कामे केली असा प्रश्न उपस्थित हाेत असताना नगरसेवकांकडे उत्तर देण्यास ठाेस कारणे नाहीत. त्यामुळे आगामी राजकीय भवितव्याची चिंता सतावत असलेल्या नगरसेवकांनी नेत्यांवर दबाव वाढवला आहे.
त्यातून सत्ताधाऱ्यांनी विराेधकांकडून येणाऱ्या यादीला अंतिम स्वरूप देण्याची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. १०० काेटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात ३८ काेटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. ४९ रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.
यात सत्ताधारी शिवसेनेने सुचवलेल्या अनेक कामांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यामुळे आता निधी मंजुरीची अडचण आहे. त्यासाठी भाजपकडूनच ६२ काेटींचे नियाेजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात महापाैर व विराेधी पक्षनेत्यांचा प्रभाग वगळता सर्वच प्रभागात कमी-अधिक प्रमाणात निधी देण्यात आल. १०२ रस्त्यांची यादी महापाैरांमार्फत नगरसचिवांकडे रवाना केली.
प्रभाग दाेनसाठी सर्वाधिक निधी
भाजपचे उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी आयुक्तांसह महापाैरांकडे दिलेल्या कामांच्या यादीत सर्वात कमी निधी प्रभाग १ मध्ये दिला आहे. तर सर्वात जास्त निधी प्रभाग २ मध्ये ९ काेटी १३ लाखांचे नियाेजन केले आहे. प्रभाग क्रमांक १५ वगळता प्रत्येक प्रभागात एक ते चार काेटींचे नियाेजन असून त्यातही रस्तेच आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.