आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ:विद्यापीठ प्रशाळांत मार्गदर्शनासाठी सहशिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता ; नाट्यशास्त्र विभाग होणार सुरू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये सहशिक्षक नियुक्त करण्यास तसेच या प्रशाळांमधील विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन (शिक्षक देवाण-घेवाण) उपलब्ध करून देण्याच्या मार्गदर्शक सूचनांना विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय विद्यापीठात नाट्यशास्त्र विषय सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विद्या परिषदेची बैठक झाली. यात मान्यता देण्यात आली.

बैठकीमध्ये या विषयांना मिळाली मान्यता Á प्रशाळांमध्ये इतर विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे यासाठी शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचा विषयही पटलावर ठेवण्यात आला होता. यासाठी प्रा. आर.एल. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा होऊन त्याला मान्यता देण्यात आली. Á विद्यापीठाच्या कला आणि ललितकला विभागांतर्गत नाट्यशास्त्र हा विषय सुरू करण्यास या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. Á विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे रूपांतर माध्यमशास्त्र प्रशाळेत करण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली.

Á परिषदेच्या बैठकीमध्ये पीएच.डी अभ्यासक्रमाच्या मौखिक परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यास मान्यता मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...