आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वैद्य श्रीरंग छापेकर यांच्या संशाेधनाची भारतासह आॅस्ट्रेलिया सरकारनेही दखल घेतली आहे. एकाच वेळी त्यांच्या तीन पेटंटला मान्यता मिळाली. ३६० डिग्री अल्ट्राव्हायाेलेट किरणांच्या माध्यमातून आयुर्वेद औषधींची सुरक्षितता व परिणामकारकता तीनपट वाढणार आहे. तसेच लाल तांदूळ व हिरव्या मुगाच्या ‘रेडी टू सर्व्ह’ बनवलेल्या सूपसाठीदेखील त्यांना पेटंट मिळाले आहे.
वैद्य श्रीरंग छापेकर हे सतत नवनवीन संंशाेधन करून आयुर्वेद उपचारासाठी प्रयत्न करतात. त्यांनी दाेन ते अडीच वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलिया सरकारला अल्ट्राव्हायाेलेट डिसइन्फेक्टंट चेंबरचे नावीन्यपूर्ण संशाेधन सादर केले हाेते. भारत सरकारकडे वैद्य छापेकर यांनी लाल तांदूळ आणि हिरवे मूग यापासून सूप तयार करण्याचे तंत्र कळवले होते. त्याला दोन्ही सरकारकडून मान्यता मिळाली असून त्यांचे पेटंट मान्य झाले आहे. एकाच वेळी तीन पेटंटला दाेन्ही सरकारकडून मान्यता मिळाल्याचे मागच्याच महिन्यात वैद्य छापेकर यांना कळवण्यात आले.
असे आहेत छापेकरांना मिळालेले पेटंट
अल्ट्राव्हायाेलेट चेंबर : अल्ट्राव्हायाेलेट डिसइन्फेक्टंट चेंबरच्या संशाेधनाचा वापर आयुर्वेद औषधांसाठी हाेणार आहे. आयुर्वेदात आैषधांसाठी वारपल्या जाणाऱ्या वनस्पती, भुकटी, चूर्ण यात बुरशी व जंतुसंसर्ग हाेऊ शकताे. या औषधी दीर्घकाळ सुरक्षित राहाव्यात आणि त्यांची परिणामकारकता वाढावी यासाठी अल्ट्राव्हायाेलेट चेंबर बनवले आहे. त्यात ३६० अंशातून अल्ट्राव्हायाेलेट किरणे पडत असल्याने त्या चेंबरमध्ये ठेवलेल्या सर्व पदार्थांवर परिणाम हाेताे. या चेंबरच्या निर्मितीसंदर्भात काही कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आयुर्वेदातील पेया आणि यूष
लाल तांदूळ व हिरव्या मुगापासून सूप तयार करण्याचे दाेन पेटंट देण्यात आलेले आहेत. या सूपला आयुर्वेदात पेया, यूष असे म्हटले जाते. या दाेन्हींपासून रेडी टू सर्व्ह बनवले जाते. यात आयुर्वेद शास्त्रानुसार पाचक घटकांचे मिश्रण आहे. आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी हलका आणि पाैष्टिक आहार त्यांना देणे गरजेचे असते. गर्भवती व प्रसूत माता तसेच सहा महिन्यांवरील बालक यांच्यासाठीही पाैष्टिक आहाराची गरज असते. पंचकर्म व पंचकर्मानंतरही हे सूप वापरता येते. सर्वसामान्य नागरिक हे सूप घेऊ शकतात असेही सांगण्यात आले आहे.
वेगवेगळ्या आकाराचे चेंबर : आतापर्यंत अल्ट्राव्हायाेलेट किरणे ही केवळ पृष्ठभागावर पडत हाेते. परंतु संशाेधनामुळे आता चेंबरमध्ये ३६० अंशातून किरणे पडतील. यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराचे चेंबर तयार केले जाणार आहेत. वनस्पती, पावडर, चुर्णाची परिणामकारकता दाेन पटीने वाढेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.