आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जलजीवन मिशन : दरडोई 55 ली. पाणी; योजनेत प्रथमच सांडपाणी, गुरांसाठी राखीव पाण्याचेही नियोजन

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल हजार कोटींच्या निधीतून जिल्ह्यातील ८४४ गावांत जलजीवन मिशन योजनेतून जलसमृद्धी येणार आहे. यातील ७० गावांत अवघ्या वर्षभरात नवीन योजनांचे पाणी उपलब्ध होणार आहे. प्रथमच गुरांसाठी आणि सांडपाण्याचा विचार करून या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. गावांतील प्रत्येक घरातील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ८४४ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर होणार आहे. या गावांना शाश्वत जलस्त्राेतातून जलसमृद्ध करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत तब्बल १ हजार २२ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. प्रत्येक गावाला पाण्याची योजना असे पुर्वी सूत्र होते. परंतु, नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशनमध्ये गाव नव्हे तर गावातील प्रत्येक घर, कुटुंब टार्गेट ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतीव्यक्ती ५५ लिटर याप्रमाणे पाणी दिले जाणार आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात अवघ्या वर्षभरातच पहिल्या टप्प्यातील योजना सुरू होण्याची शक्यता आहे. ८३८ गावांसाठी ९२६ कोटी ७८ लाख रूपयांचा आराखडा तयार केला आहे. तर ६ मोठ्या गावांसाठी ९६ कोटींचा निधी मंजूर आहे.

बातम्या आणखी आहेत...