आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविठ्ठलवाडी-मलकापूर बसमध्ये किरकोळ वादातून प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये चांगलाच राडा झाला. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणी बुधवारी भडगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा असे दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी पहिल्या फिर्यादीत नगरदेवळा येथील 56 वर्षीय वृद्ध आना सखाराम मोरे हे 7 नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी ते मलकापूर बस मधून उतरले. यावेळी बसचे वाहक दत्तात्रय गणेश नाथबुवा यांचा पाय मोरे यांच्या गुडघ्याला लागला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर वाहक नाथबुवा यांनी मोरे यांच्या गळ्यात जबरीने हात टाकत चैन हिसकविण्याचा प्रयत्न केला. तसेच गर्दीच्या ठिकाणी मोरे यांना शिवीगाळ करुन अपमान केले. हा वाद काही सहप्रवाशांनी मिटवला. यांनतर मोरे यांनी भडगाव पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार नाथबुवा यांच्या विरुद्ध जबरी लुटीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे तपास करीत आहेत.
तर दुसरी फिर्याद वाहक नाथबुवा यांनी दिली आहे. त्यानुसार, विठ्ठलवाडी ते मलकापूर बस (क्रमांक एमएच 13 सीयु 8107) बस भडगाव बसस्थानकात आल्यावर अण्णा सखाराम मोरे व त्यांचा मुलगा यांना बसमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून त्यांनी वाद घालायला. सुरुवात केली. तसेच बस वाहक दत्तात्रय गणेश नाथबुवा (वय 37) यांना शिवीगाळ करीत जबरी मारहाण केली. ऐवढ्यावरच न थांबता वाहक नाथबुवा यांना बसच्या खाली ओढून आणखी पाच ते सहा साथीदारांना बोलावून घेत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत नाथबुवा यांच्या जवळील 13 ते 14 हजार रुपये गहाळ झालेत. या प्रकरणी त्यांनी भडगाव पोलिसात धाव घेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अण्णा मोरे, त्यांचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बसस्थानकात प्रचंड गोंधळ उडाला होता. अनेक नागरीकांनी हस्तक्षेप करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.