आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुवर्णपेढ्यांना संध्याकाळी दाेन तास सशस्त्र पाेलिस बंदाेबस्त द्यावा, अशी मागणी शहर सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी केली आहे. शहरात खून, हाणामारी, गाेळीबार अशा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ हाेत आहे. शहरात गुंडप्रवृत्तीच्या तरुणांचे धमकावण्याचे प्रमाण वाढते आहे.
या घटना लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे. शहरात सात प्रमुख सुवर्ण शाेरूमसह सव्वाशेवर सुवर्णपेढ्या आहेत. जिल्ह्यातील सुवर्णपेढ्यांची संख्या साडेतीनशेच्या घरात आहे. नविपेठेतील एका सुवर्ण पेढीवर सात ते आठ वर्षांपूर्वी दराेड्याचा प्रयत्न झाला हाेता. दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात पाेलिस दलातर्फे राज्यातील सुवर्ण व्यावसायिकांकडून मागणी केल्यानंतर प्रमुख सुवर्ण शाेरूमला सशस्त्र पाेलिस बंदाेबस्त देण्यात आला हाेता. संध्याकाळी दाेन तास पाेलिस बंदाेबस्त दिला जायचा, असेही ललवाणी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.