आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटा गावला:जळगावमध्ये बियर शॉपी फोडून 72 हजारांची दारू लांबवली, पोलिसांकडून अट्टल गुन्हेगार चतुर्भुज

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचोली गावात असलेली सागर बियर शॉपी फोडून चोरट्यांनी 72 हजार 840 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 3 मे रोजी रात्री घडली होती. यातील संशयित आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी (1 जून) अटक केली. दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण (वय 22, रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

दिनकरने सागर वासूदेव लाड (वय 24) यांच्या मालकीची बियर शॉपी फोडून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या लांबवल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही चोरी दिनकरने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती.

त्यानुसार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, चेजन सोनवणे, मुकेश पाटील, नाना तायडे, सचिन पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दिनकरला सुप्रिम कॉलनी परिसरातून अटक केली.

पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बियर शॉपीतून चोरलेल्या सर्व मद्याच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. न्यायालयात हजर असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

आत्तापर्यंत 17 गुन्हे

दिनकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध जबरी लुट, दरोडा, चोरी, घरफोडी, मारहाण असे 17 गंभीर गुन्हे दाखल आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...