आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघाचा ताबा:जैसे थे आदेशाच्या धास्तीमुळे घाईतच दूध संघाचा घेतला ताबा

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा दूध संघावर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानंतर येत्या साेमवारनंतर प्रशासक पदभार घेणार हाेते. परंतु, आमदार खडसे सर्मथक संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने काही काळ स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी स्टेटस्काे दिला तर अशावेळी संस्थेवर आपलाच ताबा असला पाहिजे असे काही जाणकारांनी कळवले आहे. त्यामुळे धावपळीत रात्रीच प्रशासकांनी दूध संघाचा ताबा घेतल्याची चर्चा बाहेर आली.

संस्थांची जी क्लिष्ट आणि वादग्रस्त प्रकरणे न्यायालयात जातात त्यावेळी प्राथमिक टप्प्यात न्यायालय सुनावणी पूर्ण हाेण्यापुर्वी ‘स्टेटस्काे’ देण्याची शक्यता असते. ही शक्यता आपल्या पथ्यावर पडावी यासाठी दूध संघावर आपलाच ताबा असला पाहिजे. ताबा घेतला नाही तर संचालक मंडळाची सत्ता कायम राहू शकते, ही स्थिती लक्षात घेवून दूध संघाचे मुख्य प्रशासक मुंबईत असताना त्यांच्या मंडळातील अन्य सदस्यांनी रात्रीच संघाच्या कार्यकारी संचालकाला घरून बाेलावून पदभार घेण्यात आला.

आमदार घाईत जळगावात
दूध संघाच्या प्रशासकपदाचा पदभार घेण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण हे पुढील आठवड्यात निवांतपणे जळगावात येणार हाेते. दरम्यान, आमदार खडसेे यांच्या समर्थकांनी प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिल्याने तातडीने प्रशासकांनी घाईत जळगावातून संस्थेवर ताबा मिळवला आहे. प्रकरण न्यायालयीन स्थितीत असताना संस्थेवर ताबा असला तरच चाैकशी समितीला मदत हाेवू शकेल अशी चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...