आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत अनुकंपांतर्गत नियुक्ती करताना मागासवर्ग व अमागासवर्ग असा काेणताही भेदभाव करता येणार नाही. प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार अनुकंपा नियुक्ती अपेक्षित आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठता डावलता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अनुकंपा भरतीसंदर्भात महापालिका स्तरावर चार सदस्यीय समितीची स्थापना झाली असून चाैकशी अहवालाची प्रतिक्षा आहे.
जळगाव महानगरपालिकेत गेल्या सात वर्षापासून अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. आक्षेप असलेले कर्मचारी वगळता उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी जाेर धरत हाेती. यासंदर्भात मनपाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले हाेते. शासनाचे पत्र २७ जुलै राेजी प्राप्त झाले आहे. अनेक उमेदवारांचे वय वाढत असल्याने ते बाद हाेण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत आयुक्त विद्या गायकवाड यांनी अतिरीक्त आयुक्त शाम गाेसावी, उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, प्रशांत पाटील, सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर या चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. या समितीने अनुकंपा नियुक्तीसंदर्भातील संपूर्ण प्रकरणाची चाैकशी केली आहे.
शासनाच्या पत्रातील मुद्दे
अनुकंपा नियुक्ती करताना मागास व अमागास असा भेदभाव करता येणार नाही. प्रतिक्षा सुचीवरील ज्येष्ठतेनुसार अनुकंपा नियुक्ती द्यावी लागेल. प्रतिक्षा सुचीतील ज्येष्ठता डावलता येणार नाही.प्रतिक्षा सुचीतील ज्येष्ठतेनुसार पद रिक्त ठेवून कनिष्ठ उमेदवारास अनुकंपा नियुक्ती देता येणार नाही. त्यामुळे मनपाने दिवंगत कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेवून नियुक्ती द्यावी.पद भरती निर्बंध,अन्य कारणांमुळे सरळसेवेची भरती हाेवू शकली नाही तरी प्रतिवर्षी रिक्त पदांच्या निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार अनुकंपा पदांची भरती करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.