आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेस्कोमातानगर, दिनकरनगर, दत्त कॉलनी, काशिनाथनगरात गटारी नसल्याने नाइलाजाने रस्त्यावर कच्ची गटार खाेदून सांडपाणी साेडण्यात आले आहे. रस्ते नसल्याने देखील नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. तसेच ड्रेनेजचे व्हॉल्व्हही खाली-वर झाले असल्याने ते धाेकेदायक आहे. त्यामुळे परिसरात गटारी व रस्ते करून विविध असुविधा साेडवण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मेस्कोमातानगर, दिनकरनगर, दत्त कॉलनी व काशिनाथनगर हा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. हा परिसर दाटीवाटीने तर वसला आहेच त्याचबरोबर या परिसरातील गल्ल्यादेखील अरुंद असल्याने रहदारीस अडथळे ठरतात. त्यातच धड रस्ते नाहीत. या परिसरात गेल्या २० वर्षांपासून गटारीदेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गटारी तुंबून डासांची तर उत्पत्ती होतेच त्याचबरोबर माशांचीही भुणभुण सुरू असते.
झुडपांमुळे रोगराईला निमंत्रण
मेस्कोमातानगर, दिनकरनगर, दत्त कॉलनी, काशिनाथ नगर या परिसरात गेल्या २० वर्षांपासून गटारीच तयार केलेल्या नाहीत. त्यामुळे गटारी तुंबतात. त्यामुळे गटारी परिसरात दलदल, झुडपे व मच्छरांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. गटारींच्या लगत झाडे-झुडपे उगवल्याने या परिसरात डासांचे प्रमाण वाढून रोगराईला निमंत्रण मिळते. त्यामुळे या परिसरात फवारणीसह गटारी तयार करण्याची गरज आहे. - प्रतिभा पाटील, रहिवासी
रस्त्यांची कामे त्वरित होण्याची गरज
परिसरात अनेक भागातील रस्ते उखडलेले आहेत. त्यामुळे अनेक भागातील खडी वर आल्याने वाहनधारकांसह ज्येष्ठ व लहानग्यांना या रस्त्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे या भागातील रस्ते होण्याची गरज आहे. तसेच अनेक भागातील गटारींची कामेही होण्याची आवश्यकता आहे. - रत्ना महाजन, रहिवासी
ड्रेनेजचे खड्डे समतल नसल्याने समस्या
परिसरातही ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत; मात्र ड्रेनेजचे काम झाल्याबरोबर इतर भागांत या रस्त्यांची डागडुजी झाली. पण अजूनही ड्रेनेजचे खड्डे खाली-वर झाले आहेत. या परिसरात रस्ते झाल्यास हे ड्रेनेजही रस्त्यांच्या बरोबरीने करण्याची गरज आहे. - भास्कर पाटील, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.