आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्रजीच्या पेपरला कॉप्या पुरवण्यासाठी चांगलीच चढाओढ सुरू असताना यावल तालुक्यातील चिंचोली गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात धानोरा व चिंचोली गावातील तरुणांत तुंबळ हाणामारी झाली होती. या कारणामुळे सोमवारी गणिताच्या पेपरला बाहेरून कॉपी पुरवणे कठीण झाले होते. शाळेच्या चारही बाजूने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटच्या २० मिनिटांत मात्र हा बंदोबस्त शिथिल झाल्याने काही पालकांनी विद्यार्थ्यांपर्यंत कॉप्या पोहोचवल्या. तत्पूर्वी प्रत्येक वर्गात शांततेत कॉपी सुरू होती.
झेराॅक्सची दुकाने बंद असल्याने पालकांनी शेतात बसून हाताने काॅप्या लिहून त्या पुरवल्याचे प्रकर्षाने समाेर आले. सोमवारी दहावीचा बीजगणित विषयाचा पेपर झाला. चिंचोलीच्या शाळेत इंग्रजीच्या पेपरवेळी कॉप्यांचा पाऊस पडला.
शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या केळीच्या शेतातून पालक इमारतीपर्यंत पोहोचून कॉपी पुरवत होते. कॉपी पुरवण्याच्या स्पर्धेतून येथे काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. परिणामी सोमवारी बंदोबस्त वाढवला होता. पालक केळीच्या शेतात थांबून होते. तर दर पाच मिनिटांनी पोलिस शेतात येऊन त्यांना हुसकावून लावत होते. वर्गात कॉपी सुरू आहे, शिक्षक सर्व उत्तरे सांगत आहे, गर्दी करू नका अशा सूचना पोलिस देत होते. तुम्ही भांडण करणाऱ्यांना पकडा, इथे आम्ही शांततेत मुलांना कॉपी देतो आहे, आमचे भांडण नाही, अशी उत्तरे काही जणांनी दिली.
शेतात, रस्त्यावर हाेती गर्दी
चिंचाेली गावात दुकानदारांच्या नातेवाइकांकडे कुणाचे तरी निधन झाले होते. या मुळे झरॉक्स काढता येत नव्हती. परिणामी अनेक पालक, तरुणांनी शाळेच्या बाहेर रस्त्यावर, शेतात बसून हाताने उत्तरे लिहून त्या कॉपी वर्गात पाठवण्याचे प्रयत्न केले. परीक्षा केंद्राच्या बाजूला असलेल्या शेतातून खिडक्यांतून काॅप्या पुरवल्या.
अर्थनियोजनाचा यंदा फायदा
सोमवारी झालेला इयत्ता दहावीचा गणिताचा पेपर हा कृतिपत्रिकेनुसार होता. काठिण्य पातळी साधारण असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल, अशा स्वरूपाचा हा पेपर होता. कोरोना काळात वगळण्यात आलेला अर्थनियोजन भाग यंदाच्या कृतिपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक एक व प्रश्न क्रमांक दोनमध्ये या प्रकारातील प्रश्नांचा समावेश होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला. ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा गांभीर्याने दिली अशा विद्यार्थ्यांना या पेपरला सहज पूर्ण गुण मिळवता येणे शक्य हाेणार आहे.- व्ही. आर. कोल्हे , उपशिक्षक, का. ऊ. कोल्हे विद्यालय, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.