आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाेदा रेल्वेगेट बंद झाल्याने या भागातील आठ गावांची बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजाराे विद्यार्थी, नागरिकांची ससेहाेलपट हाेते आहे. संतप्त नागरिकांनी साेमवारी महापालिका आयुक्त, महापाैरांना घेराव घालून कैफियत मांडली. त्यानंतर पाहणी करून रेल्वेलाइनच्या भिंतीला लागून असलेल्या २०० मीटर रस्त्याचे विस्तारीकरण करून मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आसोदा रेल्वेगेट बंद करण्यात आले आहे. आता कुंभार समाज मंडळाकडून ममुराबाद रोडपर्यंत जाणाऱ्या पर्यायी मार्गावर असलेल्या लोंबकळणाऱ्या तारा, अवघड वळणामुळे बसेस नेण्यास चालक नकार देतात. परिणामी आठ गावातील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.
संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी महापालिका आयुक्त, महापौरांना घेराव घालत या भागातील अतिक्रमण व बसेससाठी पर्यायी मार्ग काढण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीवरून कुंभार समाज मंडळाकडून सरळ तिवारी केटरर्सपर्यंतचे अतिक्रमण, अडथळा ठरणारी झाडे काढून मारोती मंदिराजवळून वळून ममुराबाद नाक्यापर्यंतचा मार्ग बसेससाठी तयार करणे, रेल्वेलाइनच्या भिंतीला लागून असलेला २०० मीटरच्या रस्त्याचे विस्तारीकरण करून तो एकेरी मार्ग बसेससाठी तयार करण्याच्या सूचना खासदारांसह आयुक्त, महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. आसोद्यासह भादली, शेळगाव, कडगाव, भाेलाणे, सुजदे, देऊळवाडा या गावातील बस वाहतूक बंद आहे. यामुळे या गावातील संतप्त नागरिक, संयोजन समितीने महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यापुढे समस्या मांडली. यानंतर ग्रामस्थांना सोबत घेत आयुक्त, महापौर यांनी महारेलचे महाव्यवस्थापक संजय बिराजदार, एसटी आगार व्यवस्थापक नीलिमा बागूल व महापालिका बांधकाम अभियंता, नगररचना अधिकाऱ्यांसह नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, किशोर सूर्यवंशी, डॉ. सुनील महाजन यांनी परिसराची पाहणी केली.
दाेन्ही प्रस्तावास सहमती संयोजन समितीचे किशोर चौधरी, भादली बुद्रुक सरपंच मिलिंद चौधरी, सुभाष महाजन, गिरीश भोळे, सुनील पाटील, शरद नारखेडे, अनिल कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी रेल्वलाइनच्या बाजूने असलेली भिंत पाडून २०० फुटाचा रस्ता तयार करून देण्याचा सोईस्कर असा पर्याय मांडला. त्यानुसार जागेची पाहणी करण्यात आली.यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रस्तावास सहमती दर्शविली.
परीक्षेपुरते रेल्वेगेट सुरू ठेवा : खासदार उन्मेष पाटील यांनीही फोनवरून रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. हे दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी डीआरएम कार्यालयाकडे पाठवण्यासह मंजुरीनंतर काम सुरू करून आठ दिवसांत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परीक्षेचे दिवस लक्षात घेता काम पूर्ण होईपर्यंत रेल्वेगेट सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसांत काम न झाल्यास रेल्वेराेकाेचा इशारा देण्यात आला.
५० बसफेऱ्या झाल्या बंद
आसाेदासह परिसरातील गावांना जाणाऱ्या राेजच्या ५० बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे शाळेला येणाऱ्या दीड ते पावणेदाेन हजार विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांची गैरसाेय हाेत आहे. बसेस बंद असल्याने या विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जळगाव गाठावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसताे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.