आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसाधारण पदासाठी आरक्षण जाहीर:आसोदा गट : सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने चुरस

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसोदा गटाचे राजकीय स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. जिल्हा परिषदेत यंदाच्या पंचवार्षिकसाठी सर्वसाधारण पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आसोदा -ममुराबाद गटामध्ये यापूर्वी सर्वसाधारण महिला गटासाठी राष्ट्रवादीकडून पल्लवी जितेंद्र देशमुख, शिवसेनेच्या रूपाली सोनवणे, यांच्यात लढत झाली होती. यात राष्ट्रवादीच्या पल्लवी देशमुख विजयी झाल्या होत्या. आता पुन्हा सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुक तयारीत आहेत. यंदाही माजी सदस्या पल्लवी देशमुख, सोनवणे परिवारासह पंचायत समिती सदस्या ज्योती महाजन यांनीही याच गटासाठी तयारी सुरू केली आहे. यात नशिराबाद गट वगळल्याने व भादली बु. गटात एसटीचे आरक्षण निघाले आहे.

त्यामुळे या गटातील माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील हे आता आसोदा गटात आपले भविष्य शोधण्याची संधी आहे; मात्र शिवसेनेत फूट पडल्याने दोन गट झाले आहे. याचा परिणामही गटातील राजकारणावर होणार आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजप गट व शिवसेना, राष्ट्रवादी असे पक्ष निर्माण होऊ शकतात. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यताही आहे.

बातम्या आणखी आहेत...