आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड राेष व्यक्त:आसाेदा रेल्वेगेट सूचना न देताच बंद केल्याने राेष

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आसाेदा रेल्वेगेट रेल्वेरुळांच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी बंद करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल झाल्याने प्रचंड राेष व्यक्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट बंद ठेवण्याआधी सूचना फलक रेल्वेगेटवर लावण्यात येतो. मात्र, बुधवारी व गुरुवारी रेल्वे गेट २४ तास बंद राहणार असल्याचा फलक दिसून आला नाही.

हा फलक न लावता गेट बंद राहणार असल्याचे पत्र ग्रामपंचायतीस दिले असल्याचे रेल्वेगेटमनने सांगितले. मात्र, ही माहिती ग्रामस्थांना न मिळाल्याने ऐनवेळी लांबच्या मार्गाने जावे लागल्याने वाहनधारक, प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रेल्वेलाइनच्या मागून पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी टाकली असल्याने दुचाकी वाहने काढण्यासह अनेक अडचणी आल्या. रात्री अंधारामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. गेटच्या दोन्ही बाजूने रिक्षा थांबत असल्याने अधिक भाडे खर्च करावे लागले.

दरम्यान, अनेकांना लांबचा प्रवास करावा लागल्याने चाकरमान्यांची आॅफिसला जाण्याची वेळ टळली. त्यामुळे चाकरमान्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच या परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील रेल्वेगेट बंद असल्याचा फटका बसला. त्यांनाही वेळेवर शाळा व काॅलेजला पाेहचता न आल्याने त्यांची फजिती झाली.

बातम्या आणखी आहेत...