आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:फ्लॅट नावावर करीत नसल्याने मारहाण, शहर पोलिसात गुन्हा ; पतीला मारहाण करुन काठीने डोके फोडले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लॅट नावावर करुन देत नसल्याच्या कारणावरुन शिवाजीनगरातील सारा अपार्टमेंटमध्ये हाणामारी झाली. पत्नीने व तिच्यासोबतच्या एका व्यक्तीने पतीला मारहाण करुन काठीने डोके फोडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज ज्ञानेश्वर मेश्राम (रा. शिवाजीनगर, हल्ली मुक्काम टी. व्ही. सेंटर औरंगाबाद) यांनी फिर्याद दिलेली आहे. सपना रामकृपाल श्रीवास्तव (रा. शिवाजीनगर) ही महिला त्यांची पत्नी आहे. मेश्राम हे तिच्या नावावर फ्लॅट करुन देत नाहीत. या कारणावरुन सपना हिच्यासह योगानंद कोळी या दोघांनी त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. कोळी याने त्यांच्या डोक्यावर काठीने मारुन दुखापत केली. तू घरात रहायचे नाही, असा दम दिला.

जळगाव | विश्वासात घेऊन खोटे अमीष व आश्वासन देऊन १ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील जगन्नाथ जोहरे (रा. चंद्रप्रभा कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी सुनीता जीवन उर्फ कैलास सपकाळे (वय ३०, रा. पिंप्राळा हुडको, सिद्धार्थ नगर), जीवन उर्फ कैलास सपकाळे (वय ३७, रा. भुसावळ), दीपक (वय २४, रा. भुसावळ) व सोनू (वय २१, रा. भुसावळ) या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील याने पैशांची मागणी केली असता सुनीता आणि जीवन यांनी जोहरे दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...