आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता:ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळली ​​​​​​​; मनपाला चार वर्षांनी मिळाले शासनाकडून शहर अभियंता

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या शहर अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी. गिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी ते पदभार स्वीकारणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नवनियुक्त शहर अभियंता गिरगावकर हे मूळचे नांदेड येथील असले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहेत.

वसई विरार महापालिकेत त्यांची एका वर्षासाठी शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना मजीप्रा येथील मूळ पदावर पदस्थापना मिळाली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून शहर अभियंतापदी शासकीय अधिकारी नियुक्तीची विनंती केली होती. त्यानंतर गिरगावकर यांनी जळगाव येथे नियुक्तीसाठी विनंती केल्यावरून त्यांची जळगाव महापालिकेत शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली.

मनपा व जिल्हा परिषदेचा अनुभव
मजीप्रामध्ये १६ वर्षांपासून कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी सांभाळलेले गिरगावकर यांनी वसई विरार महापालिकेत नियुक्तीपूर्वी भिवंडी महापालिकेत चार वर्षे, उल्हासनगर महापालिकेत तीन वर्षे जबाबदारी पार पाडली. याशिवाय सोलापूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्हा परिषदेत नियुक्ती झाली होती. बी.ई सिव्हिलपर्यंत शिक्षण झालेल्या गिरगावकर यांना मोठ्या महापालिकांत शहर अभियंतापदाच्या कामाचा अनुभव आहे.

चार वर्षांत तिघांचे शिक्षण बी.ई. सिव्हिल : गेल्या चार वर्षांत सहा शहर अभियंता होऊन गेले. त्यात शासनाने नियुक्ती केलेले बी.डी. दाभाडे यांची २०१८मध्ये बदली झाली होती. ते बी.ई सिव्हिल होते. सुनील भोळे व डी.एस. खडके यांचे शिक्षणही बी.ई. सिव्हिलपर्यंत होते. विलास सोनवणी व नरेंद्र जावळे यांनी डिप्लोमा तर अरविंद भोसले यांनी डीसीई एएमआयईपर्यंत शिक्षण घेतले आहे.

सोळा वर्षांत सहावे शासकीय अधिकारी मनपाला मिळाले
महापालिकेच्या स्थापनेनंतर २००६ ते २०२२ या सोळा वर्षांच्या कालखंडात शासनाने नियुक्त केवळ सहा शहर अभियंता होऊन गेले. यात पी.डी.कुलकर्णी, बी.बी.राजपूत, गजमल ठाकरे, दिलीप थाेरात व बी.डी.दाभाडे यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...