आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडाचे पडसाद:तेव्हा आणि आताही एकनाथ शिंदेच केंद्रस्थानी : महाराष्ट्रभर उमटताहेत बंडाचे पडसाद

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्तांतरासाठी शिवसेनेने जे जळगावात केले, तेच भाजपने राज्यात करून दाखवले

जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर घडवून आणण्यासाठी शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून सत्ता काबीज केली होती. तब्बल पंधरा महिन्यांनंतर तीच वेळ शिवसेनेवर राज्यात आली असून, तेवढेच आमदार भाजपला जाऊन मिळाले आहेत. यात विधिमंडळातील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर केल्यामुळे शिवसेनेत गटनेता पदावरून वाद निर्माण झाला आहे. जळगाव मनपातही फोडाफोडीमुळे भाजप व भाजप बंडखोर यांच्यात गटनेता पदावरून न्यायालयीन लढा सुरू आहे. या दोन्ही घटनाक्रमांत एकनाथ शिंदे हेच केंद्रस्थानी होते हे विशेष.

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी दोन दिवसांपूर्वीच निवडणूक पार पडली. यात भाजपला पाच तर महाविकास आघाडीला पाच जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. शिवसेनेचे नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत २७ आमदारांना सोबत घेऊन गुजरात राज्यातील सुरत गाठले.

आज राज्यातील शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीच परिस्थिती गेल्या वर्षी मार्च महिन्यात जळगाव महापालिकेत निर्माण झाली होती. महापौर निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव महापालिकेत शिवसेनेकडे १५ नगरसेवक असताना भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत सत्ता मिळवली होती. यामुळे भाजपत मोठी फूट पडली होती. भाजप ३० निष्ठावान नगरसेवकांच्या विरोधात २७ बंडखोर अशी दुफळी निर्माण झाली होती. दरम्यान, वर्षभराच्या कालखंडात नगरसेवकांचे भाजपतून शिवसेनेकडे जाणे व शिवसेनेतून भाजपत येण्याचे प्रकार सुरूच आहेत. यात भाजप व बंडखोर नगरसेवकांमध्ये गटनेता पदावरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गटांकडून आपलाच गटनेता अधिकृत असल्याचा दावा केल्याने त्याचा निवाडा करण्यासाठी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय लागलेला नाही.

भाजपने राजकीय व्यूहरचना आखून वर्षभरातच केली शिवसेनेची परतफेड
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात थेट सुरत गाठले असून, या बंडाला भाजपचे पाठबळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिंदेंच्या भूमिकेमुळे राज्यातील शिवसेनेतही दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे यांना तडकाफडकी गटनेता पदावरून दूर करण्यात आले आहे; परंतु शिंदे यांनी आपणच अधिकृत गटनेता असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील भाजपत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीच परिस्थिती राज्यात शिवसेना अनुभवत आहे. भाजपने शिवसेनेतील नाराजीच्या माध्यमातून जळगाव मनपातील सत्तांतराचा बदला घेतल्याची चर्चा रंगली आहे.

नगरसेवकांना मिळालेहोते शिंदेंचे बळ
भाजपचे २७ नगरसेवक फोडण्याच्या प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनीच बळ दिले होते. शिंदे यांच्या नजरकैदेत नगरसेवकांना ठाणे येथे हॉटेलात ठेवण्यात आले होते. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. ‘शिंदे सांगतील तीच पूर्व दिशा’ अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे.दाेन्ही वेळच्या घडामोडीत शिंदेच केंद्रस्थानी राहिले आहेत.