आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णालयात उपचार:रामेश्वर काॅलनीत दाेन तरुणांवर हल्ला ; हल्लेखोरांनी स्थळावरुन काढला पळ

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून रामेश्वर कॉलनीतील दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. त्यात नितीन निंबा राठोड (वय २४) व सचिन कैलास चव्हाण (वय २२) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. नितीन राठोड व सचिन चव्हाण यांचा लग्नात नाचण्याच्या कारणावरून मेहरूण परिसरातील तुषार सोनवणे यांच्याशी वाद होता. रविवारी रात्री आठ वाजता नितीन हा घराबाहेर उभा असताना तुषार सोनवणे कारने काही तरुणांसोबत आला. त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्याची माहिती कळल्यावर नितीनचा आतेभाऊ सचिन हा तेथे आला. हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार करून जखमी करत हल्लेखोर तेथून लगेच पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...