आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:विसजनजीनगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फाेडण्याचा प्रयत्न ; जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख बाजारपेठेचा भाग असलेल्या विसजनीनगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फाेडण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडला. रात्री गस्तीवर असलेल्या पाेलिसांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. दरम्यान, चाेरटे एटीएममधील राेकड घेऊन जावू शकले नसले तरी त्यांनी एटीएमचे १ लाख ८० हजारांचे नुकसान केले. या प्रकरणी जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रमाेद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इच्छापूर्ती गणपती मंदिराशेजारी असलेल्या कॅनरा बँकेच्या समाेर असलेले बँकेचे एटीएम चाेरट्यांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ताेडण्याचा प्रयत्न केला. या वेळी रात्री गस्तीला असलेल्या पाेलिसांची व्हॅन या मार्गावरून जाताना सायरन वाजल्याने चाेरटे पसार झालेत. एटीएम फाेडण्याचा प्रयत्न झाल्याची बाब पाेलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. चाेरट्यांनी केलेल्या ताेडफाेडीमुळे एटीएमचे १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फिराेज तडवी हे करीत आहेत.

बंँक अधिकाऱ्याचा नकार
दरम्यान, या चाेरीच्या प्रयत्नात एटीएमचे काय नुकसान झाले. एटीएममध्ये किती रुपयांची राेकड हाेती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये किती चाेरटे आढळले याबाबत माहिती देण्यास बँक व्यवस्थापक कांबळे यांनी स्पष्ट नकार दिला. बँकेच्या नवीन नियमानुसार सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...