आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:दोन वनरक्षकांना वाळू माफियांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पोहणा क्षेत्रातील घटना

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे

वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पोहणा क्षेत्रात (दि.20) मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास दोन वनरक्षक गस्तीवर असताना वाळू माफियाकडून दोघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वडणेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोहणा वन क्षेत्रातील घनदाट परिसरात अवैधरित्या रेतीची चोरी करत असल्याची माहिती मिळाली असता,  20 मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास  वनरक्षक मनोज लिंगुराम सज्जन (वय 34) व माधव सदाशिव माने हे दोघेही (एम एच 32 ए एल 5052) या मोटर सायकलने परिसरात गस्त घालत होते. गस्तीवर असताना झुडपी सर्वे क्रमांक 43 मौजा नांद्रा येथे 10 ब्रास रेतीसाठा दिसून आला होता.   

रेतीच्या साठ्याजवळ त्यांना ट्रॅक्टरच्या चाकाचे निशन दिसले. त्यानंतर त्या निशानाचा पाठलाग करत असताना आरोपींकडून चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करण्यात आला. त्या दोघांना मौजा कोल्ही गावातून सास्तीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर अडविण्यात आले. त्यानंतर चारचाकी वाहना मधून बालु कुबडे (रा. पोहणा),नितीन वाघ (रा. जांगोना) व अनोळखी दोन व्यक्ती (रा. वडणेर) या चौघांनी दोघांच्या अंगावर मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास पेट्रोल टाकूण जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडणेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वडणेर पोलिसांनी  या चौघांविरुद्ध  शासकीय कामात अडथळा व पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भादवी 307,353,332 व 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वडणेर पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...