आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न:जुन्या वादातून महिलांसह तिघांना जबर मारहाण, एक जण गंभीर, अमळनेरमधील घटना

जळगाव | प्रतिनिधी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यातील एका गावात जुन्या वादातून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, तिघांना जबर मारहाण करण्यात आली. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी 9 जणांविरुद्ध विनयभंगासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची वहीणी गावातील सार्वजनिक नळावर धुणे धुण्यासाठी गेले होते. धुणे धुऊन परत येत असतांना ९.३० वाजेच्या सुमारास गावदरवाज्याजवळ विनोद पवार याने त्यांना अडवले. ‘आमच्या विरुध्द केलेल्या केसेस मागे घ्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत त्याच्यासह शरद उखा पवार याने महिलेचा विनयभंग केला. यानंतर पिडीत महिलेने तिथून पळ काढला.

पीडितेला जबर मारहाण

त्यानंतर नऊ जण पुन्हा एकदा पिडीत महिलेच्या घरासमोर गेले. यात विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रुपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, रतीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील यांचा समावेश हाेता. या जमावाने लाकडी, लोखंडी रॉड, पेट्रोलने भरलेल्या बाटलीसह पिडीत महिलेवर हल्ला केला. पिडीतीची आई, वहीणी, यांच्या अंगावर शरद पवार याने बाटलीमधील पेट्रोल टाकले व विनोद सुकदेव पवार याने त्याच्या काडीपेटीने जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

इतरांनाही लाथा-बुक्क्या

आरोपींनी इतर लोकांनाही धक्काबुक्की व चापटा बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पिडीत महिलेचा भाऊ गंभीर झाला आहे. तसेच सतिष पाटील यांना देखील मार लागल्याने दोघांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नऊ जणांच्या विरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने तपास करीत आहेत.

एक जण आयसीयूत
गंभीर जखमी अवस्थेत असलेले सतिष पाटील बेशुद्ध आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आयसीयूत उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...