आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये दरोडा:वृद्धेस ठार मारण्याचा प्रयत्न; 10 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 1 लाखाचा ऐवज लंपास

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला वृद्धेस गळा दाबुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करून घरातील 10 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार, 21 जून रोजी धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावात घडली.

गुन्हा दाखल

जखमी झालेल्या वृद्धेवर उपचार करण्यात आल्यानंतर 23 जून रोजी पहाटे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिठाबाई नारायण पाटील (वय 64) असे महिलेचे नाव आहे. गावातच राहणाऱ्या दीपक प्रल्हाद पाटील याने ही चोरी केली आहे.

जखमी मिठाबाई नारायण पाटील
जखमी मिठाबाई नारायण पाटील

कशी घडली घटना

मिठाबाई यांचे मुलं, सुना जळगावात राहतात. चावलखेडा येथे त्या एकट्याच राहतात. याचा फायदा उचलत दीपक पाटील याने त्यांच्या घरात घुसून गळा दाबला. डोक्यावर वीट मारली. मिठाबाई विव्हळत असल्याचे पाहुन शेजारी राहणाऱ्या संगीता मुकुंदा वाणी ह्या त्यांना वाचवण्यासाठी घरी आल्या. दीपकने संगीता यांना देखील मारहाण केली. त्यांच्याही गळ्यातील पोत लांबवली.

दोन्ही महिलांना केली मारहाण

दोन्ही महिलांना मारहाण केल्यानंतर दीपकने पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळ्याची पोत, दोन तोळ्याच्या साखळ्या, आठ ग्रॅम वजनाचे कानातले व पाच ग्रॅम वजनाच्या अंगठ्या तसेच एक लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. या झालेल्या हल्ल्यात मिठाबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहोत. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी बुधवार 22 जून रोजी रात्री पोलिसांना झालेल्या प्रकारबद्दल माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.