आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने समन्स बजावले आहे. त्यांना येत्या ३० डिसेंबर राेजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. आपण या चाैकशीत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी जळगावात पत्रकारांशी बाेलताना सांगितले. भाेसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. या प्रकरणात गेल्या पाच वर्षांत पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकरप्शन ब्युराेतर्फे वेगवेगळी चाैकशी झाली. त्याशिवाय झाेटिंग समिती आणि आयकर विभागानेदेखील स्वतंत्र चाैकशी केली आहे. यापूर्वी चार एजन्सीमार्फत चाैकशी केलेली असून ईडी या प्रकरणाची चाैकशी करणारी पाचवी एजन्सी आहे. शासकीय मूल्यांकनानुसार ५ काेटी रुपयांमध्ये हा भूखंड खरेदी केलेला हाेता.
माझ्या कुटुंबातील व्यक्तीने ताे खरेदी केला; परंतु त्याच्याशी माझा संबंध नव्हता, असे एकनाथ खडसे पत्रकारांशी बाेलताना म्हणाले. या प्रकरणातील सर्व कागदपत्रांसह आपण या चाैकशीला उपस्थित राहून पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीत प्रवेश केला त्याच दिवशी आपण ईडी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली हाेती. त्यामुळे या प्रकरणाला राजकारणाशी जाेडण्यात आले आहे का? यावर त्यांनी बाेलणे टाळले.
नेत्यांच्या प्रतिक्रिया...
जे तुमच्या विरोधात आणि तुमचा राजकीय सामना करू शकत नाही अशा लोकांविरुद्ध ईडी, सीबीआय, आयकरच्या चौकशा लावल्या जात आहेत. अशांविरुद्ध विराेधकांनी एकत्र येऊन मजबूत संघटन उभे करावं, असे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. नोटीस येणार हे खडसेंनी आधीच सांगितले होते. भाजप विरुद्ध बोलेल, अशांवर ईडीच्या तलवारी लटकल्या आहेत. इतर मार्गाने त्रास देण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. नोटीस दिल्याचे माहिती नाही. ईडी लावण्याचे काम भाजपचे नाही. तरीही खापर भाजपवर फोडणार असाल तर तुम्हाला सीडी लावण्यापासून कुणी रोखले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.