आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसं‌ख्येत वाढ:जीएमसीत ओपीडीत राेज 250 रुग्ण सर्दी, तापाचे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तापमानात झालेल्या घसरणीमुळे सर्दी-खाेकला, तापाच्या रुग्णसं‌ख्येत वाढ हाेत आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षात राेज सुमारे सहाशे रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यापैकी २५० ते २७० रुग्ण हे सर्दी, खाेकला व तापाचे असल्याचे तीन ते चार दिवसांपासून समाेर येत आहेत. जीएमसीच्या आैषध भांडारात खाेकल्याचे सिरप संपले आहे. नवीन साठा येण्यासाठी दाेन ते तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कफ कमी करण्यासाठी सिरप गुणकारी मानले जाते. पूर्वी ते मुबलक मिळायचे. आता शासनाने त्याचा पुरवठा कमी केला आहे. सर्दी, खाेकला कमी करण्यासाठी अँटिबायाेटिक व इतर गाेळ्या दिला जात आहेत. गाेळ्यांचा वापर वाढला आहे असे जीएमसीचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. विजय गायकवाड यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...