आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षण:प्लास्टिकचा वापर वर्ज्य; अन्यथा घटणार 25 गुण; एकेक गुणासाठी धडपड

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ही स्वच्छतेची परीक्षा अधिक कठीण केली आहे. महापालिकेने केवळ लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक करून चालणार नाही, तर स्वत:लाही स्वच्छतेचा धडा शिकावा लागेल. मनपाला सर्वेक्षणाच्या ब्रँडिंग दरम्यान कोणत्याही प्लास्टिक बॅनरचा वापर करता येणार नाही. तसे आढळल्यास महापालिकेचे २५ गुण वजा होतील.

स्वच्छ सर्वेक्षण २०२३च्या ब्रँडिंगची तयारी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन २.० आणि स्वच्छ सर्वेक्षणात ब्रँडिंगसाठी बॅनर, कॅरीबॅग किंवा प्लास्टिकचा वापर करू नये, असे निर्देश आहेत. निर्बंध असताना तसे केल्याचे आढळल्यास मनपाच्या २५ गुणांची कपात होऊ शकते. त्याऐवजी घोषणा, भिंतीवरील चित्रे, कलाकृती इत्यादी प्रदर्शित करता येणार आहेत. ब्रँडिंगसाठी शहरातील प्रवेशद्वार, घरांबाहेर पडण्यासाठी मागील गल्लीत, पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी, शासकीय कार्यालये, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह, बाजारपेठ, चौक यांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

...तर १० ते २५ गुण मिळतील, काळजी घ्यावी लागणार
अशा पद्धतीने ब्रँडिंगसाठी गुणही निश्चित केले आहेत. त्यात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रचार व प्रसारासाठी २५ गुण, प्रभागातील ७५ ते ९० टक्के प्रचार व प्रसारासाठी २० गुण, प्रभागातील ५० ते ७४ टक्के प्रचार व प्रसारासाठी १५ गुण आणि प्रभागांसाठी ५० टक्केपेक्षा कमी प्रचारासाठी १० गुणांची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...