आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक व शाकाहार प्रवर्तक स्व. रतनलाल सी. बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुसुंबा येथील रतनलाल सी. बाफना गो-सेवा अनुसंधान केंद्रात ‘आर.सी. बाफना मेमोरियल'' उभारले जात अाहे. नुकतेच या वास्तूला FCCEA व अल्ट्राटेक सिमेंटतर्फे ‘उत्कृष्ट ठोस संरचना पुरस्कार २०२३''द्वारे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘सार्वजनिक वास्तू'' या श्रेणीत देण्यात आला. ‘आर.सी. बाफना मेमोरियल'' हे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वास्तूपैकी एक ठरले आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ सुमारे ४५ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या अहिंसा तीर्थमध्ये शेकडो गायींचे पालनपोषण केले जाते. तसेच वेगवेगळ्या कलात्मक निर्मितीद्वारे अत्यंत आकर्षक आणि प्रेक्षणीय आहे.
त्यातच नव्याने बांधण्यात येणाऱ्या आर. सी. बाफना मेमोरियलमुळे अहिंसातीर्थच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार आहे. या आगळ्या वेगळ्या वास्तूची संरचना, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या कलाकृती, आर.सी. बाफना म्युझियम व यासारखे अनेक आकर्षण येथे असणार आहेत. स्व. बाफनाजी यांच्या स्वर्णिम आयुष्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर. सी. बाफना मेमोरियल''चे निर्माण करण्यात येत आहे. इंजिनिअर अमेय बर्वे यांनी बांधलेल्या व आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी डिझाइन केले आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाइन मिलिंद राठी यांचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.