आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:क्षयरोगाबाबत पथनाट्याद्वारे राजोरा परिसरामध्ये जनजागृती, राजोरा आरोग्य उपकेंद्राने राबवला उपक्रम; प्रतिसादामुळे हेतू सफल

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजोरा येथील आरोग्य उपकेंद्रातर्फे गावात पथनाट्यातून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यात क्षयरोगाची लक्षणे, उपचार पद्धतीसह शासना कडून क्षयरोग संदर्भात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तालुक्यात महिनाभरापासून जनजागृती सुरू असून हा कार्यक्रम घेण्यात आला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांच्या मार्फत उत्कृष्ट कार्यक्रम व जनजागृती करणाऱ्या पथकास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद अंतर्गत येणाऱ्या राजोरा आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता स्पर्धा आणि क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन झाले.

पथनाट्यापुर्वी ग्रामपंचायत कार्यालयात महिला मंडळाची सभा घेऊन क्षयरोग शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी राजोरा येथील लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई पाटील, राजोरा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जाकीर पिंजारी, आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे, शिक्षिका संध्या सोनवणे, आशा वर्कर आशा पाटील, मंगला सोनवणे, मनीषा महाजन, ज्योती ठाकरे, पोलिस पाटील मुक्ता गोसावी, ग्रामसेवक प्रविण चौधरींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. जनजागृतीसाठी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी फलकावर क्षयरोगाविषयी माहिती लिहून फलक वाचन कार्यक्रम झाला. पथनाट्य लक्षवेधी ठरले.

बातम्या आणखी आहेत...