आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:ब. गो. शानभाग विद्यालयात श्रीमद् भगवद गीता जयंतीनिमित्त कार्यक्रम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोक्षदा शुक्ल एकादशी रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात गीता जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक जगदीश चौधरी, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सूर्यकांत पाटील, ज्येष्ठ शिक्षिका अनुराधा देशमुख यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमा व श्रीमद भगवद्गीता ग्रंथ पूजन करण्यात आले. प्रास्ताविक अनिता शर्मा यांनी केले. भगवद गीतेचे महत्व आणि माहिती प्रकाश जोशी आणि नकुल पाटील यांनी दिली. १५ वा अध्यायानाचे वाचन कथन शालेय विद्यार्थ्यांनी केले. श्लोकाचे अनुवाद मराठीतून सामूहिकपणे संस्कृत शिक्षक व विद्यार्थी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...