आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:जिल्हा दूध संघातील संशयितांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघात बेकायदेशीरपणे स्निग्ध पदार्थ (स्पॉइल्ड फॅट) बनवल्याचा प्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्व संशयितांनी मंगळवारी जामिनासाठी अर्ज केले. त्यावर २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे.

दूध संघाने हे बी ग्रेड तूप असल्याची माहिती दिली होती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता ते मानवी आरोग्यास हानीकारक असे स्निग्ध पदार्थ असल्याचा अहवाल दिला आहे. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एमडी मनोज लिमये, हरी पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल व चंद्रकांत पाटील या सहा जणांना अटक केली होती. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...