आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Balaji Rathotsava Begins With Great Jubilation In Chopda; Mandiyali Of Thousands Of Devotees; The Chariot Will Stay At Shivaji Maharaj Chowk

चोपड्यात मोठ्या जल्लोषात बालाजी रथोत्सवाला सुरुवात:हजारो भाविकांची मांदियाळी; शिवाजी महाराज चौकात रथ राहणार मुक्कामी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

150 वर्षांची परंपरा असलेल्या चोपड्याच्या बालाजी रथोत्सव आज दि 6 रोजी दुपारी बारा वाजता बालाजी मंदिरापासून विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, बालाजी संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी ,नायब तहसीलदार अजित बांबळे ,माजी गटनेते जीवन चौधरी,पालिकेचे मुख्यधिकारी हेमंत निकम,माजी उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, चोपडा पीपल्स बँकेच्या चेअरमन चंद्रहास गुजराथी,उद्योजक आशिष गुजराथी,गोविंद गुजराथी, यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी रथोत्सवाची विधिवत पूजा करण्यात आली.

बालाजी रथोत्सवात शेकडो वर्षाची परंपरा चालवीत आहेत हे परिवार चोपड्याच्या हया बालाजी रथोत्सवाला तब्बल 150 वर्षांची मोठी परंपरा असून ज्या परिवाराच्या वतीने वेगवेगळ्या पूजा,असतील किव्हा मोगऱ्या लावण्याचे,तेल सोडण्याचे काम असेल ते काम हे परिवार आजही करत आहेत.

त्यात विक्रम देशमुख यांच्या हस्ते रथाचे चक्रपूजन करण्यात आले.यावेळी मोगरी चेतन लोहार,महेश लोहार, आबा महाजन,संजय लोहार,नंदलाल चौधरी,कैलास लोहार,युवराज पारधी, श्रीराम चौधरी,दगडू देशमुख यांनी लावली तर रथाला सेंदुर लावण्याचे मानकरी म्हणून महेश शाह,मिलींद शह यांनी काम पाहिले.तेल लावण्याचे मानकरी चंद्रकांत बडगुजर यांनी काम पाहिले तर विक्रम देशमुख यांच्या हस्ते रथाचे चक्रपूजन करण्यात आले. -विधिवत पूजा प्रमोद पाठक यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...