आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:केळीपाठाेपाठ साेयाबीन, कापसावर राेगाचा प्रादुर्भाव ; ढगाळ वातावरणामुळे 6 लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढगाळ वातावरण खरिपातील पिकांवर राेगराई वाढीसाठी पाेषक असल्याने सध्या पिकांवर राेगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. केळीपाठाेपाठ आता साेयाबीन, कापूस ही पिके राेगराईला बळी पडत असल्याने शेतकरी वर्गाची झाेप उडाली आहे. जिल्ह्यात तब्बल साडेपाच लाख हेक्टरवर कापूस, ४५ हजार हेक्टरवर केळी आणि २९ हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा आहे. हे तीनही पिके या महिन्यात राेगराईला बळी पडली आहेत. केळीवर सीएमव्ही या राेगाचा तर कापसावर तुडतुडे आणि काही ठिकाणी बाेंडअळीचा शिरकाव झाला आहे. साेयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याची स्थिती आहे. ऐन फुलाेरात साेयाबीनवर राेगराईचा प्रभाव जाणवत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

केळीच्या बागा स्वच्छ ठेवणे, साेयाबीनवर फवारणी
वातावरण ढगाळ असल्याने पिकांवर राेगराई दिसत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच राेगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययाेजना केल्या पाहिजे. बाेंडअळीचे संकट अजून दिसत नसले तरी जिनिंग कारखान्याच्या दाेन किमी क्षेत्रात सापळे लावणे आवश्यक आहे. केळीच्या बागा स्वच्छ ठेवणे आणि साेयाबीनवर फवारणी आवश्यक आहे.
- डाॅ. हेमंत बाहेती, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद

शेतकऱ्यांनी अशी घ्यावी आपल्या पिकांची काळजी
कापूस : तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हेक्टरी पाच फेराेमाेन सापळे लावावेत, लाल्या राेगाच्या नियंत्रणासाठी खताची मात्रा नियमित शिफारसीपेक्षा २५ टक्के अधिक द्यावी. हेक्टरी ३० किलाे मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. २ टक्के डीएपी फवारणी करावी.
साेयाबीन : ढगाळ वातावरणाने खाेडमासीचा प्रादुर्भाव आहे. त्यासाठी क्लाेरानट्रानिलीप्राेल फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी पाच फेराेमाेनन सापळे लावावेत. पिवळसर पानांवर १३:००:४५ खताची फवारणी करावी.

बातम्या आणखी आहेत...