आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीचा आढावा:वादळाने केळीच्या बागा भुईसपाट; सरसकट पंचनामे करा : पालकमंत्री

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना वादळासह पावसाचा फटका बसलाआहे. या परिसरातील २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेआहे. या नुकसानीची पाहणी रविवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन केली. या वेळी व्यथा-वेदना सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचेआदेश दिले. भोकरसह परिसरातील गावांना वादळी पावसाने फटका दिला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक नंदगावसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत प्रांत सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. जंगले, कृषी सहायिका अनिता जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, कृषी तक्रार निवारण समिती सदस्य डॉ. सत्वशील पाटील, माजी सभापती भरत बोरसे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, योगेश लाठी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या काळात पोटच्या पोराप्रमाणे जपलेली केळी, वादळामुळे आडवी झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावला गेल्या. तातडीने भरपाई अपेक्षित आहे.

केळीचे नुकसान जास्त
भोकर महसूल मंडळातील २१५१ शेतकऱ्यांचे २०३७ हेक्टर केळीचे नुकसान झाले. पिंप्राळा महसूल मंडळातील ६५ शेतकऱ्यांचे ५४ हेक्टर असे एकूण २२१६ शेतकऱ्यांचे २०९१ हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झालेआहे. पालकमंत्र्यांनी तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन तातडीने भरपाई मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...