आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतांचा मेळा:बंजारा महाकुंभ : गाेद्री गावात १० लाख  भाविकांसह ८ राज्यांचे मुख्यमंत्री येणार

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या जानेवारी महिन्यात जामनेर तालुक्यातील गाेद्री या गावात हिंदू गाेर बंजारा, लबाना-नायकडा या समाजाचा देशातील पहिला महाकुंभ आयोजित हाेत आहे. त्यामुळे जळगाव, औरंगाबाद आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील ४० गावांमधील नागरी सुविधांची कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन या कुंभाच्या व्यवस्थेबाबत यंत्रणेला सूचना केल्या. हिंदू गाेर बंजारा, लबाना-नायकडा समाजातील प्रमुख संत-महंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुंभासाठी गोद्रीची निवड करण्यात आली आहे. बंजारा समाज केंद्रस्थानी असलेल्या या कार्यक्रमाला हिंदू आणि शीख समुदायातील प्रमुख १०० संत सहभागी हाेणार आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गाेवा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि या राज्यांमधून १० लाख लाेक कुंभासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी गावात हेलिपॅड आणि प्रमुख रस्ते तयार केले जात आहेत.

परिसरातील रस्ते, पाणी आणि विजेच्या समस्या एका महिन्यात सुटणार दरराेज दाेन-अडीच लाख भाविक येणार, कामांना वेग २५ ते ३० जानेवारीदरम्यान सहा दिवस चालणाऱ्या कुंभात दरराेज दाेन-अडीच लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावाशी जाेडणाऱ्या परिसरातील ४० गावांचे प्रमुख रस्ते, पुलांची कामे १० कोटींच्या निधीतून युद्धपातळीवर केली जात आहेत. अतिक्रमण ताेडून गावातील रस्तेही केले जात आहेत. अजिंठा डाेंगराच्या पायथ्याशी १ हजार कुटुंबांच्या या गावात हेलिपॅडही तयार केले जात आहे.

या प्रमुख महंतांची उपस्थिती मुरारीबापू, राममंदिर ट्रस्टचे गाेविंदगिरी महाजन, साध्वी ऋतंभरा देवी, याेगगुरू रामदेवबाबा, महंत रघुमणी, दमदमी टकसालचे प्रमुख बाबा हरनामसिंगजी, गुरू शरणानंदजी, नंदबाबा, श्रीश्री रविशंकर, पाेहरादेवी संस्थानचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, पाल येथील गाेपाल चैतन्य महाराज, तेलंगणचे संत रामसिंग महाराज, सुरेश महाराज, लबाडा समाजाचे मध्य प्रदेशातील महंत चंद्रसिंग महाराज, प्रसन्नसिंग महाराज, संचालन समितीचे श्याम चैतन्य महाराज यांच्यासह १०० संत-महंत उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रम { कुंभासाठी फत्तेपूर व गाेद्री या गावांतील ५०० एकर जमीन लागणार आहे. फत्तेपुरात १०० एकर जमीन, २५० एकर पार्किंग, सांस्कृतिक कार्यक्रम-प्रदर्शनांसाठी ५० एकर जमीन, गाेद्री येथील धार्मिक कार्यक्रमासाठी ५० एकर जमीन उपयाेगात येईल. { अन्य कार्यक्रमांसाठी काही ठिकाणी निवास व्यवस्था केली जाईल. यात बंजारा समाजाच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीवर आधारित प्रदर्शने असतील. प्रत्येकी ७ हजार लाेकवस्तीची तांडा संकल्पेनवरील गावे उभी केली जाणार आहेत. { या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५ हजार स्वयंसेवक, तर आयाेजनासाठी ५ हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. धर्मजागरण समन्वयकडून आयाेजनासह जागरणाचेही काम केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...