आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन बसस्थानकातील बॅनरचा सांगाडा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. हा बॅनरचा सांगाडा गेल्या अनेक दिवसांपासून दोन खांबांना तारांनी जरी अडकवला असला तरी हे तार गंजून गेल्याने हा सांगाडा पडण्याचा धोका आहे. हा बॅनरचा सांगाडा झाडाजवळ असल्याने येथे अनेक प्रवाशांसह विद्यार्थीही थांबत असल्याने काही अप्रिय घटना घटण्याआधी हा बॅनरचा सांगाडा हटवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नवीन बसस्थानकात प्रसाधन गृहाजवळ बसस्थानकाच्या मध्यभागी एका बाजूला खांब्याला अडकवलेले तर दुसऱ्या बाजूला जमिनीलगत टेकलेला बॅनर धोकादायक ठरू शकतो. बॅनरला बांधलेले तारही गंजून गेलेले असल्याने हा सांगाडा निखळू शकतो. येथे झाडांची दाट सावली असल्याने दरराेज या ठिकाणी अनेक प्रवासी व विद्यार्थी बसची वाट बघत थांबत असतात. त्यामुळे भविष्यात सांगडा पडून काही अप्रिय घटना घडण्याआधी हा बॅनरचा सांगडा हटवण्याची मागणी एसटी प्रवाशांकडून केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.