आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाची स्थापना:आनंदघरात मुलांनी तयार केलेल्या बाप्पाची स्थापना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदघरात मुलांनी स्वत: तयार केलेल्या शाडूमातीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. आनंदघरात प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगात व निर्णयप्रक्रियेत मुलांचा सहभाग असतो. मुलांनीच ठरवल्यानुसार आनंदघरात बाप्पाची स्थापना करण्यात आली.

आनंदघरात गणपती बसवण्याआधी गणपती विकत आणायचा की घरी बनवायचा येथपासून ते त्याची काळजी कशी घेणार, प्रसादाची जबाबदारी आपण कशी वाटून घेणार, सजवणार कोणती करणार, बाप्पा बसवणार कोण, विसर्जन कोण करणार, कसं करणार आदींवर चर्चा करण्यात आली. गणपती बनवण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळाही घेण्यात आली. यात मुलांनी सुंदर गणपती बनवले. यात मुलांनी गट करून सर्व जबाबदाऱ्या घेतल्याने संपूर्ण १० दिवस मुले हा गणपती सांभाळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...