आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींची घाेषणा, 784 काेटींचा निधी मिळणार:बऱ्हाणपूर-औरंगाबाद हायवेच्या चाैपदरीकरणाला अखेर मंजुरी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरहून औरंगाबादला आता कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. जळगाव आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या ‘एनएच-७५३ एल’च्या शाहपूर बायपास ते मुक्ताईनगर या भागाच्या रस्ता चौपदरीकरणाला हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलखाली मंजुरी देण्यात आली आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत यासाठी ७८४.३५ काेटींचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्वीटद्वारे ही घाेषणा केली आहे.

सध्याचा दोन पदरी कॅरेजवे मार्ग हा एनएच-७५३ एलचा एक भाग आहे. तो पहूरजवळील एनएच-७५३ एफच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरला जोडतो. यात जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर व खंडवाजवळील एनएच-३४७ बीचाही समावेश झाला आहे. प्रकल्प मार्गातील दापोरा, इच्छापूर आणि मुक्ताईनगर येथे आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूदही करण्यात आली आहे, असे गडकरींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. इंदूर येथून औरंगाबाद येथे जाण्यासाठी लागणारे अंतर आता कमी हाेऊन इंधन व वेळेतही बचत होईल.

बातम्या आणखी आहेत...