आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणास सुरुवात:हायटेक उद्याेगासाठी बार्टी उद्यापासून देणार प्रशिक्षण ; निवासाची व्यवस्था

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गांसाठी अनिवासी मोफत ‘हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास’ प्रशिक्षण ७ सप्टेंबरपासून तर अनुसूचित जमातीसाठी ‘निवासी उद्योजकता विकास’ प्रशिक्षणास ६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण ‘अप्लाइड डेटा सायन्स अॅन्ड अॅनॅलिटिकलसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे इंजिनिअरिंग महाविद्यालय, आयटी आॅटोमेशन प्रोग्राम अॅण्ड बेसिक जापनीज् हा कोर्स केबीटी इंजिनिअरिंग काॅलेज तर सायबर सिक्युरिटी अॅण्ड डाटाबेस रिकव्हरी या कोर्ससाठी एमव्हीपी काॅमर्स मॅनेजमेंट अॅण्ड काॅम्प्युटर सायन्स काॅलेज, नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाईल.

उत्तर महाराष्ट्रातील ४० जणांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण
नाशिकच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने अनुसूचित जमातीच्या बेरोजगार उमेदवारांसाठी उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक असलेले उद्योजकता विकास प्रशिक्षण हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल रोडवरील आंबोली वीकेंड होम या ठिकाणी आयोजित केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ४० उमेदवारांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी मंगेश बनकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...