आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबीए:राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणामुळे बीबीए, बीएमएस, बीएम.एस-ई कॉमर्स अभ्यासक्रम

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीमुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये लागू करण्यात आलेला प्रथम वर्ष बीबीए, बीएमएस, बीएम.एस-ई कॉमर्स हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता जसाचा तसा लागू राहणार आहे. सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांच्या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या टर्ममधील विद्या परिषदेची ही शेवटची बैठक होती.

बैठक कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आठ दिवसांपासून या बैठकी संदर्भातील प्रस्ताव मागवण्यात आले होते. चर्चेअंती प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या पीडित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची भर काढून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सन २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच विद्याशाखा, व्यावसायिक कोर्सेसच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. परिणामी प्रथम वर्ष बीबीए, बीएमएस, बीएम.एस-ई कॉमर्स हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता जसाचा तसा लागू ठेवावा लागला. पुढच्या वर्षी त्यातही बदल करण्यात येतील. या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव किशोर पवार आदी उपस्थित होते.

भुसावळ, मुक्ताईनगर महाविद्यालयात बी.व्हाेक अभ्यासक्रमांना मान्यता
तापी परिसर विद्यामंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय फैजपूर महाविद्यालय बंदबाबत समितीचा सकारात्मक अहवाल सादर. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव संस्थेच्या नावात व आर्टिफिशियल इंटिलिजन्स व डाटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या नावात बदल होणार. आता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट असे नाव आता करण्यात येणार आहे.

एआयसीटीई नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या अनुषंगाने जामिया इस्लामिया ईशातूल उलूमचे इन्स्टिट्यूट अक्कलकुवा महाविद्यालयातील बी.ई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व बी.ई. ई अँड टीसी अभ्यासक्रम बंद.

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात टी. वाय. बी.व्होक केमिकल अँड फार्मा अनॅलिटिकल सायन्स अभ्यासक्रमाला सुरुवात करणे. मुक्ताईनगर येथील महाविद्यालयात एस.वाय.बी.व्होक जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू.

बातम्या आणखी आहेत...