आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य शाखेच्या निकालात 10 टक्क्यांनी वाढ:बी.कॉमच्या प्रथम वर्षाचा सुधारित निकाल जाहीर; द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल तयार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाणिज्य शाखेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या निकालात बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सामूहिक गुणदानाची मागणी केली होती. यावर विद्यापीठाने तोडगा काढत तांत्रिक अडचणी दूर करत नव्याने निकाल जाहीर केला आहे. प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून 95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत ही टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या आठवड्यात वाणिज्य शाखेचे निकाल जाहीर झाले. यात बहुतांश विद्यार्थी दोन ते तीन विषय अनुत्तीर्ण झालेले होते तर तब्ब्ल 108 विद्यार्थ्यांना इंटरनल परीक्षेत शून्य गुण देण्यात आले होते. प्रश्नपत्रिकेत चुका आढळल्यांनतर विद्यार्थ्यांनी कुलगुरू प्रा.डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांना निवेदन दिले होते. निकाल लागल्यानंतर देखील विद्यापीठाकडून लक्ष न देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सामूहिक गुणदाणाची मागणी केली होती. या समस्येवर तोडगा काढत विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेतील चुका, तांत्रिक दोष दूर करत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे सुधारित निकाल जाहीर केले आहे. यात प्रथम वर्षाचा निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून सर्व्हरच्या अडचणींमुळे द्वितीय व तृतीय वर्षांचा निकाल मंगळवारी सायंकाळपर्यंत अपलोड झाला नव्हता. हा निकाल देखील लवकरच अपलोड करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी सांगितले. दरम्यान इंटरनल परीक्षेत विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने वाणिज्य शाखेचा निकाल कमी लागला असल्याचा निष्कर्ष परीक्षा विभागाने काढला आहे.

95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

प्रथम वर्षाला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील 6 हजार 129 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. नवीन निकालानुसार यातील 5 हजार 591 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर चार टक्के विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. त्यामुळे निकाल 95 टक्क्यांवर पोचला आहे. परीक्षा विभागातर्फे 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान रात्री उशीरा पर्यंत निकालाचे काम करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...