आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाम्पत्याची 4 लाखांची फसवणूक:खोदकामात सापडलेले सोने विकण्याची मारली थाप; चौघांवर गुन्हा

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खोदकामात सोन्याचे दागिने सापडले असून ते विकायचे आहे असे सांगत चार अनोळखी व्यक्तींनी शहरातील एका दाम्पत्याची 4 लाख 20 हजार रुपया फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभाष रामदास लोखंडे (वय ५४, रा. विश्वदीप कॉलनी, पिंप्राळा) यांची फसवणूक झाली आहे. लोखंडे दाम्पत्य 13 जून रोजी जूने बी. जे. मार्केट परिसरात खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांना तेथे दोन अनोळखी पुरूष भेटले. ‘खोदकामात आम्हाला लाखो रुपयांचे दागिने सापडले आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर कमी पैशात देऊ’ असे त्यांनी सांगीतले.

या दोघांवर विश्वास ठेऊन लाेखंडे दाम्पत्याने सोने खरेदीची तयारी दाखवली. यानंतर त्या दोघांनी दाम्पत्यास एक सोन्याचा मणी दिला. दाम्पत्याने सराफाकडे नेऊन तपासला असता तो मणी खरा होता. यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर भामट्यांनी लाेखंडे यांचा फोन नंबर घेऊन दुसऱ्या दिवशी बोलावतो असे सांगीतले. दोन-तीन दिवस त्यांच्यात संवाद सुरू होता.

17 जून रोजी भामट्यांनी लाेखंडे यांना पांडे चौकात पैसे घेऊन बोलावले. यावेळी एका महिलेसह चार भामटे चौकात थांबुन होते. लाखंडे यांनी भामट्यांना 4 लाख 20 हजार रुपये दिले. एक पिशवी लाेखंडेंच्या हातात देऊन लवकर घरी जा असा निरोप देऊन भामटे तेथुन पसार झाले. लाेखंडे यांनी 21 जून रोजी भामट्यांकडून मिळालेले सोने सराफाकडे तपासणीसाठी नेले असता ते नकली असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अखेर लाेखंडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.