आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये विवाहितेला मारहाण:घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह सासू - सासऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरून घर घेण्यासाठी 5 लाख रूपये आणत नसल्याने विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला आहे. तर सुनेला मुलगा व्हावी अशी अपेक्षा असताना मुलगी झाली, याचा प्रचंड राग आल्यामुळे सासरच्या लोकांनी विवाहितेचा प्रचंड छळ करत मारहाण केली. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री पियुष महाजन (वय 26, रा. भुसावळ) असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. 4 डिसेंबर 2017 रोजी जयश्रीचे लग्न रावेर येथील पियुष छगनलाल महाजन यांच्याशी झाले. दरम्यान, लग्नानंतर जयश्रीला मुलगाच झाला पाहिजे. वंशाला दिवा मिळाला पाहिजे. अशी अपेक्षा महाजन कुटुंबियांकडून केली जात होती. परंतु, जयश्रीला पाहिलीच मुलगी झाली. त्या दिवसापासून पतीसह सासू, सासऱ्यांनी तीचा छळ सुरू केला. मारहाण सुरू केली. यातच नवीन घर बांधण्यासाठी जयश्रीने माहेरहून पाच लाख रुपये आणावे अशी मागणी देखील वारंवार केली.

जयश्रीने माहेरहुन पैसे न आणल्यामुळे तीला आणखी जास्त त्रास देण्यास सुरूवात केली. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळुन अखेर ती माहेरी निघुन आली. दरम्यान, जयश्रीने रविवारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती पियुष महाजन, सासु अलकाबाई, दीर कुणाल व सासरे छगनलाल सखाराम महाजन या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...