आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी:पदविका अभ्यासक्रमाचे अर्ज भरण्यास सुरुवात; 8 जुलैपर्यंत भरता येणार अर्ज

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना आता 8 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या गुणवत्ता याद्या 11 जुलैला तर अंतिम गुणवत्ता याद्या 15 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

आठ जुलैपर्यंत भरता येणार अर्ज

तंत्रशिक्षण संचालनातंर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करता पोस्ट एचएससी पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. प्रक्रियेअतंर्गत विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करुन ई-स्क्रूटनी पर्याय निवडू शकतात असे तंत्रशिक्षण संचलनालयाने संकेतस्थळावर कळवले आहे.

असे आहे वेळापत्रक

9 जून ते 8 जुलै - ऑनलाईन नोंदणी, कागद्पत्राणाच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.

9 जून ते 8 जुलै - कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती

11 जुलै - विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.

12 ते 14 जुलै - गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे.

15 जुलै - अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे

बातम्या आणखी आहेत...