आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायसोनी पतसंस्था घोटाळा:रक्षा खडसे, अॅड.पाटील यांच्या तक्रारीनंतर चौकशी, अनेक माेठी नावे पुढे येणार - एकनाथ खडसे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड हजार काेटी रूपयांवर आर्थिक गैरव्यवहार असलेल्या बीएचआर मल्टीस्टेट साेसायटीप्रकरणी चाैकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे, अॅड.किर्ती पाटील आणि आपण स्वत: सातत्याने पाठपुरावा केला. त्यावेळी राजकीय दबाव हाेता, मात्र आता यंत्रणेने हा दबाव झुगारून चाैकशी सुरू केली आहे, यात अनेक माेठी नावे पुढे येणार असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अनेक ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बीएचआर पतसंस्थेची चाैकशी आणि कारवाईचे अधिकार केंद्राला असल्याने माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे आणि अॅड.किर्ती पाटील यांनी २५ जून २०१८ राेजी तत्कालीन केंद्रीय सहकारमंत्री राधामाेहनसिंग यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली हाेती. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले. याबाबत खासदार रक्षा खडसे आणि अॅड.पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १ जानेवारी २०२० राेजी खासदार खडसे आणि अॅड.पाटील यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र ताेमर यांची भेट घेवून निवेदन दिले हाेते. दरम्यान, पाेलिसांकडून या प्रकरणाची चाैकशी सुरू झाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याप्रकरणात चाैकशी सुरू असल्याने त्यात बाधा येऊ नये म्हणून आपण काेणाचेही नाव घेणार नसल्याचे खडसे यांनी स्प‌ष्ट केले. यावेळी अॅड.किर्ती पाटील यांनी पाठपुराव्याबाबत माहिती दिली.

सुनील झंवरांनी घेतली केंद्रीय मंत्री ताेमर यांची भेट : दुसरीकडे या प्रकरणातील मास्टर मांईड सुनिल झंवर याने ९ आॅगस्ट २०२० राेजी दिल्लीत जावून केंद्रीय मंत्री ताेमर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीत माजी मंत्री गिरीश महाजन आणि खासदार उन्मेष पाटील हे देखील सुनिल झंवर याच्यासाेबत हाेते.

राजकीय दबावामुळे चाैकशी लांबली...
सन २०१८ पासून बीएचआर प्रकरणात आपण पाठपुरावा करीत हाेताे. याबाबत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली हाेती. त्यावेळी मंत्री देशमुख यांनी यात कारवाई करू नये म्हणून आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगितले हाेते. यावरून आपण मंत्री देशमुखांना सुनावले हाेते. राज्यात भाजपचे सरकार असेपर्यंत या प्रकरणात दडपण्याचा प्रयत्न झाला. केंद्रात देखील ही चाैकशी दडपण्याचे प्रयत्न झाले, असे खडसेंनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser