आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाईचंद हिराचंद रायसोनी या अवसायनात असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थेने कर्जवसुलीसाठी एकमुस्त परतफेड योजना (ओटीएस) लागू केली. या योजनेत केवळ ७७ कर्जदारांनी सहभाग घेतला. त्यांचे प्रिन्सिपल कर्जाची रक्कम १०१ कोटींवर असून, त्यांना १३२ कोटी ५२ लाख ७२ हजार रुपयांची ओटीएस मंजूर झाली आहे. या योजनेकडे मोठ्या कर्जदारांनी पाठ फिरवली आहे. अद्यापही ठेवीदारांच्या ७०० कोटींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकलेल्या आहेत.
योजनेत सहभागी न झालेल्या कर्जदारांना विलफूल डिफॉल्टर घोषित करून त्यांच्याविरुद्ध वसुलीची कठोर कारवाई करण्याचा इशारा अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिला आहे.बीएचआरने एकमुस्त परतफेड योजना २०२२ लागू केली होती. सर्व कर्जदारांना या योजनेत सहभागी होण्याचे अावाहन अवसायकांनी ८ जून रोजी केले होते. या तारखेपासून ३० दिवसांच्या आत त्यांच्या कर्जाच्या पाच टक्के रकमेसह संस्थेच्या मुख्य कार्यालयात अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. जे कर्जदार या योजनेत सहभागी होणार नाहीत, त्यांच्याव कारवाई करण्यात येणार आहे.
...तर नऊ टक्के व्याजासह होणार वसुली
ओटीएस लागू केलेल्या कर्जदारांना पहिल्या तीन महिन्यांत २५ टक्के ओटीएस रक्कम भरायची आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम नंतरच्या तीन महिन्यांत भरायची आहे. या कालावधीत परतफेड न केल्यास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळेल. मात्र, त्यासाठी ओटीएस लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ टक्के व्याजासह परतफेड करावी लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.