आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर घोटाळा:अटकेतील आरोपींची पैसे भरण्याची तयारी, सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत

जळगाव / गणेश सुरसेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात, बीएचआर पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासातील दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी थेट मोठ्या कर्जदारांनाच अटक केल्यामुळे बेकायदा ठेव पावत्या खरेदी करून कर्जफेड दाखवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अटकेतील काही कर्जदारांनी पावत्यांद्वारे फेड दाखवलेली रक्कम पतसंस्थेत भरण्याची तयारी दाखवली असून तसे जबाब ते न्यायालयात देणार असल्याचे वृत्त आहे. या अटीवर त्यांची सुटका झाली तर कर्जफेडीचा मोठा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता असून पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्यांसाठी तो दिलासादायक ठरू शकतो.

पुणे पोलिसांनी १७ जून रोजी राज्यभरात छापे टाकून भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (जळगाव) या ११ जणांना अटक केली आहे. हे सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पतसंस्थेतून कोट्यवधी रुपये कर्ज घेऊन त्यातील बहुतांश रक्कम त्यांनी ठेवीदारांच्या पावत्या जमा करून फेड केल्याचे दाखवले आहे. या ठेव पावत्या त्यांनी अत्यल्प किमतीत खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून २० ते ३० टक्के रकमेत ठेवी खरेदी केल्या त्यांचेही नुकसान झाले आणि पतसंस्थेत रोख रक्कम न गेल्यामुळे इतर ठेवीदारांनाही पैसे परत देता आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. दोघांच्या नुकसानीचा फायदा मात्र कर्जदारांनाच झाला आहे.

अटकेपूर्वीच कर्जफेड वाढू शकते... : नव्याने कर्जफेडीचा फायदा अटकेतील संशयित आरोपींना न्यायालयात मिळाला तर अनेक मोठे कर्जदारही कर्जफेडीच्या तयारीला लागू शकतात. कारण, आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ६५० कर्जखाती एफडी मॅचिंगने निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांना आर्थिक गुन्ह्याच्या कटातील आरोपी म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना नवे अवसायक नासरे यांना देण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते आहे.

बातम्या आणखी आहेत...