आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर येथून कल्याणला जाताना हाेंडा कारचे (सीजी.०४-डीएफ.५०४७) मागील टायर फुटले. यामुळे गाडीचे संतुलन बिघडून ती महामार्गावर उभ्या टँकरवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील वृद्ध महिला (वय ६०) व तिची दीड वर्षांची नात ठार झाली. तर चालक दीपकसिंग आलुवालिया व त्यांची पत्नी जखमी झाली. खडका चाैफुलीजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात होताच वाहतूक ठप्प झाली हाेती.
छत्तीसगडमधील रायपूर येथून दीपकसिंग आलुवालिया हे त्यांची पत्नी गुंजन आलुवालिया, दीड वर्षाची मुलगी बानी व आई सुजिंदरकौर यांना घेऊन कल्याणला निघाले होते. भुसावळात खडका चौफुलीवर कारचे चालकाकडील बाजूचे मागील टायर फुटले. यामुळे अनियंत्रित झालेली कार महामार्गावर डाव्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर आदळली. या अपघातात दीपक सिंग यांच्या आई सुजिंदरकौर या जागीच ठार झाल्या. तर मुलगी बानी ही जळगावात दगावली. स्वत: दीपकसिंग व त्यांच्या पत्नी गुंजन जखमी झाल्या. दरम्यान, अपघातानंतर दोन्ही जखमी महिलांना रूग्णवाहिकेतून डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेण्यात आले.
दीड वर्षाच्या बानी या मुलीला नागरिकांनी खडका चौफुलीजवळील लहान मुलांच्या हाॅस्पिटलमध्ये नेले. यानंतर तिला रात्री जळगावला हलवले. पण, दुर्दैवाने ती तेथे दगावली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेचे एपीआय स्वप्नील नाईक व सहकाऱ्यांनी ती सुरळीत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.